॥ अर्पण पत्रिका ॥

अमेरिकेतील ब्लॅक पॅंथरचे संस्थापक, नेते ह्यू न्यूटन आणि भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयात आणि नंतर आजपर्यंत आंबेडकरी चळवळीसाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य वाहिले त्या सर्व कार्यकर्त्यांना हे पुस्तक अर्पण करीत आहोत…..

पुस्तकाबद्दल

सहवासातले आठवले

(खंड पहिला)

रामदास आठवले हा आंबेडकरी चळवळीतील न दुर्लक्ष करता येणारा अध्याय आहे… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जागतिक मानवी हक्कांच्या चळवळीतील भारतातील हे एक प्रमुख नाव आहे. मानवी हक्कांसाठी १९५६ नंतर ज्या कुणी आपल्या छातीचा कोट करून ही आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली आहे, त्यात रामदास आठवले हे नाव कधीच पुसता येणार नाही. उलट कार्यकर्ता ते नेता आणि नेता ते राजसत्ता ही प्रेरणादायी गोष्ट त्यांच्या आयुष्यातून येणाऱ्या पिढीने नक्की शिकावी अशी आहे !

मनोगत...

आठवले साहेब समजून घेण्यापूर्वी…

… डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताची समाज रचना समजून घेणं गरजेचं आहे….

भारतामध्ये दोन विचारसरणींचा कायमस्वरूपी संघर्ष हजारो वर्षांपासून दिसून येतोय एक ब्राम्हणी तत्वज्ञान आणि दुसरं बुद्धाचं तत्वज्ञान. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याची नीट मांडणी त्यांच्या लिखित पुस्तकात केली आहे आणि त्यांच्या अनेक भाषणांत केली आहे. ब्राम्हणी धर्माच्या तत्वज्ञानामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र अशी मांडणी उतरंडीनुसार हायरारकी नुसार आहे आणि हीच उतरंड ब्राम्हणी तत्वज्ञानास कायम ठेवायची होती, आहे आणि भविष्यातही राहणार आहे. बुद्ध तत्वज्ञान आणि ब्राम्हणी तत्वज्ञान या मधील संघर्ष हा या व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष आहे. यामध्ये आधुनिक काळात कोणती मूल्ये स्वीकारणार हा प्रश्न बाबासाहेबांनी सातत्याने विचारलेला आपण पाहतो. त्यासाठी बाबासाहेब स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि लोकशाही ही मूल्ये समाजाला देशाला देण्याचा प्रयत्न करतात. 

एक नंबरला ब्राम्हण, दोन नंबरला क्षत्रिय, तीन नंबरला वैश्य आणि चार नंबरला शूद्र, अतिशूद्र (अति शूद्र मध्ये ५०% लोकसंख्या असलेल्या सगळ्या स्त्रिया येतात.) अगदी ब्राम्हणांच्या स्त्रियापण अतिशूद्र आहेत, क्षत्रियांच्या स्त्रिया सुद्धा अतिशूद्र आहे आणि वैश्यांच्या स्त्रिया सुद्धा अतिशूद्र आहेत. शुद्रांच्या स्त्रिया आणि अतिशूद्र स्त्रिया सुद्धा शूद्रच आहेत, हे ब्राम्हणी तत्वज्ञान बाबासाहेबांना मान्य नव्हतं! चार वर्ण आणि साडे सहा हजार जाती बाबासाहेबांना मान्य नव्हत्या. त्यांना याला पर्याय म्हणून बुद्ध तत्वज्ञान भारतात रुजवायचं होतं. ज्यामध्ये कुणीही एक नंबर नाही, कुणीही दोन नंबर नाही, कुणीही तीन नंबर नाही आणि कुणीही चार नंबर नाही. सर्वांना संधीची समानता बाबासाहेबांना अपेक्षित आहे. व्यक्ती जन्माला आल्यावर त्याला त्याच्या संपूर्ण क्षमतांचा विकास करण्यासाठी कुटुंब, शाळा, विद्यापीठ आणि भोवतालचा समाज याने वातावरण तयार करून द्यायला हवे असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावरची लढाई, संसदेची लढाई, सांस्कृतिक लढाई, शैक्षणिक लढाई, राजकीय लढाई, सामाजिक लढाई, धार्मिक लढाई!….

लेखकांबद्दल

मा . प्रवीण मोरे

मा .प्रवीण मोरे हे एक प्रतिष्ठित लेखक आहेत, ज्यांनी आपल्या साहित्यकलेतून समाजात नवी उर्जा निर्माण केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांचे स्वीय सहाय्यक म्हणून मागील 15 ते 16 वर्षांच्या वैचारिक प्रवासात सोबती आहेत
, त्यांनी मंत्री साहेबांच्या विविध अनुभवांचा आणि संघर्षांचा संग्रह आपल्या लिखाणातून मांडला आहे. त्यांच्या लेखणीतील सच्चाई आणि स्पष्टता वाचकांना प्रभावित करते. प्रवीण यांनी आठवले साहेबांच्या जीवनातील विविध पैलूंवर आधारित अनेक खंड संपादित केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी इतर मान्यवर व्यक्तींच्या अनुभवांचाही समावेश केला आहे. त्यांच्या लिखाणातील निष्ठा आणि पारदर्शकता समाजाच्या समजणुकीला नवी दिशा देतात.

प्रवीण मोरे यांचे साहित्यक कौशल्य आणि अनुभवांचे अचूक वर्णन वाचकांना प्रेरणा देतात. त्यांचे लिखाण फक्त कथा सांगत नाही, तर विचारांना चालना देऊन वाचकांच्या मनावर अमिट छाप सोडते. लेखक म्हणून त्यांनी समाजातील विविध घटकांशी संवाद साधला आहे आणि त्यांचे विचार त्यांच्या पुस्तकांमधून सजीव झाले आहेत. प्रवीण मोरे हे लेखक म्हणून आपल्या अनोख्या दृष्टिकोनातून समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचे कार्य करत आहेत.

मा .चंद्रमणी जाधव

मा .चंद्रमणी जाधव हे एक संवेदनशील आणि आंबेडकरवादी दृष्टिकोनातून लेखन करणारे लेखक आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना’ हे एक वैचारिक दृष्ट्या एक प्रगल्भतेच असणार लेखन त्यांनी केलेला आहे.

चंद्रमणी जाधव यांच्या एकूणच लेखनातून आणि विचारातून त्यांची दिशाही स्पष्ट येते की, आंबेडकरी चळवळीतील घडणाऱ्या घडामोडी, नेतृत्व, हाती घेतलेले विषय याचं डॉक्युमेंटेशन ( दस्तावेजीकरण) झालं पाहिजे ते भविष्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरेल असं त्यांचं मत आहे.
त्यांच्या लेखनामधून भाषाशास्त्राचं आणि एकूणच पुरोगामी विचाराची मांडणी दिसून येते. मान नाम. रामदासजी आठवले साहेब यांच्या सहवासात राहून एक मोठं साहित्य, अनेक खंड काढण्याचा त्यांचा मानस होता त्यातला पहिला खंड आज आंबेडकरी आणि अभ्यासकांना समाजातील गरीब लोकांचं नेतृत्व आणि काम करणाऱ्या सर्वांना ते प्रेरणा प्रेरणादायी ठरणार आहे आणि हा दस्तावेज आपल्याकडे जपून ठेवावा या इतिहासाच्या मांडणीचा निश्चितपणाने भविष्य काळामध्ये उपयोग होईल या पद्धतीचे लेखन त्यांच्याकडून झालेला आहे